मोहोळ तालुका /प्रतिनिधी,
सेलेरो कार व स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवार 23 मे रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर गावच्या शिवारात पंढरपूर पालखी मार्गावर घडली
. इरफान नुरखाँ खान वय ४०, बीमजीर इरफान खान ३७, मुजाहिद इरफान आतार ३७, आफरीन मुजाहिद आतार २७, इनाया इरफान खान २, अराफत मुजाहिद आतार १० वर्षे (सर्व रा. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. तर अरहान इरफान खान १० वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी ३५, मनिषा मोहन हुंडेकरी ३० वर्षे (दोघे रा. गादेगाव ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
मोहोळ येथील खान व आतार कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. रविवार 21 मे रोजी ते सेलेरो कारने (क्रमांक एम एच 13 डीटी 8701) मोहोळ कडे परतत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार पेनुर गावच्या शिवारातील माळी पाटी परिसरात आली होती. यावेळी मोहोळहुन पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या स्कॉर्पिओने (क्रमांक एम एच 13 डी.ई. 1242) त्यांच्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये इरफान नुरखाँ खान वय ४०, बीमजीर इरफान खान ३७, मुजाहिद इरफान आतार ३७, आफरीन मुजाहिद आतार २७, इनाया इरफान खान २, अराफत मुजाहिद आतार १० वर्षे (सर्व रा. मोहोळ) हे सहा जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर अरहान इरफान खान १० वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी ३५, मनिषा मोहन हुंडेकरी ३० वर्षे (गादेगाव) हे गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशा चक्काचूर झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. सध्या जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी अंत झाल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.
आज रोजी 16.30 वाजण्याच्या सुमारास मौजे पेनुर पासून पुढे दोन किमी अंतरावर रमेश माने माजी सरपंच यांचे घराजवळ सेलेरो कार गाडी क्र MH 13 DT 8701 व स्कार्पिओ गाडी क्र यांचे समोरासमोर जोरात धडक होऊन झालेल्या अपघातात सेलेरो कार गाडी क्र MH 13 DT 8701 मधील 1) मुजाहिद इमाम आत्तार वय 35 वर्षे 2) इरफान नूरजहाँ खान वय 30 वर्षे 3) बेनजीर इरफान खान वय 28 वर्षे हे तिघेजण जागीच मरण पावले आहेत . तसेच सदर गाडीमधील एक महिला व तीन लहान मुले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अंबुलन्स मध्ये सोलापूर येथे उपचारा कमी पाठविण्यात आले आहे होते. त्यापैकी 4) अफरिन मिजाहित अत्तर वय 27 वर्षे 5) इनाया इरफान खान वय 2 वर्षे 6) अरफत मुजाहित आत्तार वय 10 वर्षे हे मरण पावले आहेत.आरहान इरफान खान वय 7 वर्षे हा गंभीर जखमी असून अश्विनी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे.
स्कार्पिओ गाडीमधील चालक अनिल सुभाष हुंडेकरी रा गादेगाव,मनीषा मोहन हुंडेकरी हे जखमी असून त्यांना उपचारकामी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे .