Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

सोलापूर  : सोलापूर महानगपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी महापालिकेच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून त्या संदर्भात आज महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रम बस डेपो येथे आणि हैदराबाद नाका येथील जागेची पाहाणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त विक्रमसिहं पाटील, सहायक नगर रचना संचालक संभाजी कांबळे,सिद्राम तुपदोळकर, सहायक अभियंता किशोर सातपुते,परिवाहन व्यवस्थापक पडगानूर आदी मन्यावर उपस्थित होते.या संदर्भात आवश्यक ती माहिती घेण्यात आले असून एक मॉडेल पेट्रोल पंप म्हणून महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.त्याच बरोबर मा. आयुक्त यांनी परिवाहन बस डेपो विभागाची सुद्धा पाहणी केली असून परिवाहन विभागातील अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *