Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट
  • आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
  • शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योग महत्त्वाचा
  • खासदार डॉ. जयसिध्‍देश्वर महास्वामीजी यांचे आवाहन

शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. योगाचा अर्थच निरोगी जीवन आहे. मानसिक शांती, समाधानासाठी आणि परमात्माशी जोडण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर पटवून दिले आहे. त्याचा अधिक व्यापक प्रमाणात प्रसार करावा, अशी अपेक्षा डॉ. जयसिध्‍देश्वर महास्वामीजी यांनी आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.

सोलापूरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्‍युरो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘मानवतेसाठी योगा’ आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. महास्वामीजी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी कुलगुरू इरेश स्वामी, सहाय्यक पोलिस अधिक्षक साई कार्तिक, नेहरू युवा केंद्राचे माजी राज्य संचालक प्रमोद हिंगे, जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, योग समन्वयक मनमोहन भुतडा, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, पोलीस उपअधिक्षक अमोल भारती, शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, तहसीलदार अंजली कुलकर्णी, मच्छिंद्र सकटे आदी उपस्थित होते.

श्री. शिवशंकर म्हणाले, योग हे भारतीय पुरातन विज्ञान आहे. संपूर्ण जगाला स्‍वस्‍थ देण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत आहे. आधुनिक जीवनशैलीत कामाचा ताण तणाव यामध्ये बिपी, शुगर होत आहे. त्यासाठी पुरातन योग शास्त्राच्या आधारे नियमित योगासने करून त्याला रोखता येईल. पि.टी.च्या तासापासूनच शालेय जीवनामध्ये योग शिकवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जैन गुरूकुल प्रशालेच्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थींनी म्युझिकल योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशा कसरती करून उपस्थितांची मने जिंकली. आठव्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीला जितेंद्र महामुनी यांनी शंखध्वनी करून सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थेच्यावतीने राजशेखर लक्ष्मीश्वर यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले. योग सेवा मंडळ आणि योग सेवासदन संस्थेच्या वतीने लता माळगे यांनी उभी व बैठे योगासने घेतली. विवेकानंद केंद्राच्या वतीने सुहास देशपांडे यांनी पोटावरील व पाठीवरील योगासने घेतली. पतंजली योग पिठाच्या वतीने अश्विनी जाधव यांनी प्राणायाम घेतले. आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने राजू जुंजा यांनी ध्यान धारणा योगासने घेतली.

यावेळी घेण्यात आलेल्या योगगुरू स्पर्धेतील डॉ. शोभा शहा, जितेंद्र महामुनी, राजशेखर लक्ष्मेश्वर, प्रकाश जाधव यांना उपस्थितांच्या हस्ते योगगुरू म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर लक्ष्मेश्वर यांनी केले. सुनील आळंदी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलीस बँड यांनी अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सदरील कार्यक्रमा मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा पासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्‍तालय, जिल्‍हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, पोलिस अधिक्षक कार्यालय, पुण्‍यशोल्‍क अहिल्‍याबाई होळकर सोलापूर विदयापीठ, एन.एच.आय., एस.आर.पी.एफ, पोलिस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी. बटालियन 9 व 38, जिल्‍हा माहिती कार्यालय, राष्‍ट्रीय सेवा योजना, सह संचालक उच्‍च शिक्षण कार्यालय, भारत स्‍काउट गाईड, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्‍था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्‍याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *