MH13NEWS Network
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजीव प्राथमिक शाळा येथील ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाचा विषय नागपंचमी श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय होता. वाइल्ड लाइफ कंजर्वेशन असोसिएशन सोलापुर चे सचिव, दुर्ग व पर्यावरण प्रेमी आणि सर्पमित्र श्री संतोषभाऊ धाकपाडे यांनी यावेळी सापांचे विविध प्रकार त्यांना ओळखण्याच्या खुणा, त्यांच्या अधिवास, त्यांचे भक्ष त्यांचे जीवनमान याविषयी माहिती दिली.
तसेच साप चावल्यानंतरचे प्रथम उपचार व घ्यावयाची काळजी या बद्दलही त्यांनी माहिती दिली. व्याख्यानाच्या शेवटी पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्याविषयी अनेक मुक्त प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना श्री संतोषभाऊ यांनी समाधानकारक अशा प्रकारची उत्तरे दिली. या सर्प विषयी आपल्या मनामध्ये असलेले गैरसमज या व्याख्यानाच्या माध्यमातून दूर झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आतकरे, बालाजी सोलंकर व उर्मिला साठे यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी ऑनलाइन व्याख्यानमालेस बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.