- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निषेधाचे पाठवले पत्र
- आग लगी बस्ती मे, मोदी, शहा अपने ही मस्ती में…!
- घोषणांनी परिसर दणाणला
उत्तर प्रदेशातील बदायू या जिल्ह्यात एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविका महिलेवर सामूहिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी च्या निषेधार्थ आज सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने नगरसेविका सुनिता रोटे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निषेधाचे पत्र ही पाठवण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्यातील बदायू याठिकाणी एका महिलेवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटले आहेत. आज सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला. आग लगे बस्ती मे, मोदी, शहा अपने ही मस्ती मे, यूपी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलन करताना लता फुटाणे, शशिकला कसपटे, गौरा कोरे, अप्रीन पटेल, संपदा खांडेकर, जया नाकोड, उषा बेसरे, मेहजाबिन कामटीकर, अश्विनी भोसले, सुनिता गायकवाड, या महिला पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा: नगरसेविका सुनिता रोटे
उत्तर प्रदेश राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत आहेत, बदायू या जिल्ह्यात एका 50 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही निषेध करतो. या घटनेमुळे योगी सरकारला मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. या घटनेची जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी केली.