कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या नव्या रूपाला थोपवण्यासाठी सोलापुरात तिसऱ्या स्तराचे म्हणजे २७ व २८ जून रोजी काढलेल्या आदेशांतर्गतचे निर्बंधच पुढील आदेशापर्यंत लागू असतील. याबाबतचा नवा आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काल रविवारी रात्री काढला. आधी प्रमाणेच नियमावली असणार आहे.
शनिवारी आणि रविवारी शहर परिसरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती .दुकानांच्या वेळेचा कालावधी कमी करण्यात येणार आहे .अशी चर्चा व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी नव्याने आदेश काढून संभ्रम दूर केला आहे.
असे आहेत आदेश…
जीवनाश्यक नसलेली सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरू राहतील. पाचनंतर संचारबंदी असेल. हॉटेल हे ५० टक्के क्षमतेने दुपारी चारपर्यंत चालवता येतील. चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत पार्सल सेवेस मुभा असेल. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून इतर शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेत नसणारे सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील.
खुल्या मैदानात मॉर्निंग वॉक, सायकलिंग, आऊट डोअरसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा राहील. मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम ५० टक्के उपस्थिती क्षमतेने करता येतील, विवाह सोहळा ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करता येईल. भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांना सकाळी ७ ते दुपारी ते ४ वाजेपर्यंतची वेळ असेल. सर्व शाळा, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असतील. ऑनलाइन शिक्षणास मुभा आहे.
Leave a Reply