प्रसाद दिवाणजी /9309140005
सोलापूर शहरातले पेट्रोल पंप २४ तास चालू ठेवायला हरकत नाही, तसा आदेश लवकरच देणार असल्याचे सांगितले. आज पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
ग्रामीण च्या तुलनेने सोलापूर शहरात पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे असे असताना शहरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे .स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता मिळावी यासाठी राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी प्रयत्न केले होते .
त्यासोबत शहरातील पेट्रोल पंप आधीच्या वेळेप्रमाणे सुरू करावेत याची ही मागणी प्रकर्षाने केली जात होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे यांना प्रश्न विचारला असता शहरातील पेट्रोल पंप सुरु राहतील असे पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले.