Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9News Network

कुटुंबातील महत्वाचा सदस्य म्हणजे गॅस सिलेंडर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. विशेषता महिला वर्गांना गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी एजन्सीच्या नंबरवर फोन करावा लागतो किंवा एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन नंबर लावला लागतो. पण आता व्हॉट्सॲप मेसेज करून गॅस सिलेंडर बुक करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आता, तुमच्या स्मार्टफोनवरून आणि त्यातच विशेष म्हणजे तुमच्या WhatsApp क्रमांकावरून गॅस बुक (Gas Booking systems) करण्याची सुविधा ग्राहकांना मिळेल.

देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपन्या भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस या आपल्या ग्राहकांना WhatsApp द्वारे गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा देत आहेत.

हे आहेत नंबर…

इंडेन गॅसचे ग्राहक 7588888824 नंबरवर बुकिंग करू शकतात. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा नंबर 7588888824 सेव्ह करावा.

यानंतर WhatsApp ओपन करा आणि तुमच्या रडिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून Book किंवा REFILL# असा मेसेज लिहून पाठवा.

REFILL# असं लिहून मेसेज पाठवल्यास ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. रिप्लायमध्ये बुकिंग केलेला गॅस सिलिंडर तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल याची माहिती असेल.

Bharat Gas च्या बुकिंगसाठी तुम्हाला 1800224344 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला WhatsApp वर जावं लागेल.

त्यानंतर सेव्ह केलेल्या नंबरवर Hi किंवा Hello असा मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक ऑटो रिप्लाय येतील.

जेव्हा तुम्हाला सिलिंडर बुक करायचा असेल तेव्हा केवळ त्यावर Book असं टाईप करून पाठवा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ऑर्डर डिटेल आणि गॅस सिलिंडर कधी मिळेल याची माहिती मिळेल.

HP Gas च्या ग्राहकांसाठी 9222201122 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचं WhatsApp सुरू करा. त्यानंतर सेव्ह केलेल्या क्रमांकावर Book असं लिहून मेसेज पाठवा.

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रमांकावर ऑर्डर डिटेल्स मिळतील. तसंच तुमचा गॅस सिलिंडर कधी डिलिव्हर होईल याची माहितीही मिळेल.

ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस कंपन्यांकडूनही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एचपी, इंडेन आणि भारत गॅसचे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

गॅस सिलिंडर बुक करताना तुम्हाला त्याच नंबरवरून मेसेज करावा लागेल जो एजन्सीकडे रजिस्टर्ड आहे. कोणत्याही रजिस्टर नसलेल्या नंबरवरून बुकिंग करता येणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वपूर्ण आणि वेगवान बातमीसाठी 7790921313 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला ॲड करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *