Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

साेलापूर एनटीपीसीला वर्षाला सहा लाख 60 हजार मेट्रीक टन बायाेमासची गरज
दाेन महिन्यात निघणार टेंडर: महाप्रबंधक श्रीनिवास राव – बांबूमॅन पाशा पटेल यांच्यात संवाद

साेलापूर : साेलापूरच्या एनटीपीसीमध्ये दगडी काेळशाबराेबर सात ते दहा टक्के बायाेमास जाळण्यास परवानगी मिळाली असून पुढच्या दाेन महिन्यात याचे टेंडर निघणार आहे. यानंतर साेलापूर एनटीपीसीला वर्षाला सहा लाख 60 हजार मेट्रीक टन बायाेमास लागणार असल्याची माहिती साेलापूर एनटीपीसीचे मुख्य महाप्रबंधक श्रीनिवास राव यांनी बांबूमॅन पाशा पटेल यांच्याशी चर्चा करताना दिली. थर्मल पाॅवर सेंटरमध्ये बायाेमास ज्वलनाच्या विषयावर पाशा पटेल यांनी साेलापूर एनटीपीसीला भेट देऊन चर्चा केली यावेळी ते बाेलत हाेते. दक्षिण सोलपुरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचना आणि नियोजनाने सोलापुर एनटीपीसी कार्यालयात हा संवाद सोहळा झाला.
साेलापूर एनटीपीसीचे डीजीएम गुरुदास मिश्रा, एचआर जीएम श्रीनिवास मूर्ती यांचीही उपस्थिती हाेती. बांबूमॅन पाशा पटेल यांनी राव यांना बांबूपासून तयार हाेणार्या बायाेमासबद्दलची सविस्तर माहिती देताना म्हणाले की, पॅरिस कराराप्रमाणे कार्बन उत्सर्जन राेखण्यासाठी आता देशाअंतर्गत असलेल्या सर्व थर्मल पाॅवर सेंटरमधून दगडी काेळशाचे ज्वलन टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात येत आहे. कारण जास्तीचे कार्बन ऊत्सर्जन हे पृथ्वीच्या तापमान वाढीला मदत करीत आहे. एकट्या सोलापुर थर्मल मधून जर रोज दोन हजार मेट्रिक टन दगडी काेळसा जाळला जातो. एक किलो दगडी काेळसा जाळला तर दोन किलो 800 ग्राम कार्बन ऊसतर्जन होते. या नियमाप्रमाने सोलपुर एनटीपीसी रोज 56000 किलो आणि वर्षाला दोन कोटी एक लाख 60 हजार किलो कार्बन उत्सर्जन करते. एवढे कार्बन उत्सर्जन होत राहिले तर या पृथ्वीवर मानव जातच राहणार नाही हे उघड आहे, हे पाशा पटेल यानी निदर्शनास आणून दिले. म्हणून दगडी काेळशाला पर्याय म्हणून आता बायाेमास वापरण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असून मी महाराष्ट्र शासनाला विनंती केल्यानंतर त्यांनी परळी थर्मल पाॅवर सेंटरमध्ये प्रायाेगिक तत्त्वावर दहा टक्के बायाेमास ज्वलन करण्यासंबंधी टेंडर काढले आहे. या बायाेमासमध्ये चार हजार उष्मांक (कॅलरीक व्हॅल्यु) असलेले बायाेमास लागते. त्यानुसार दगडी काेळशाइतकाच उष्मांक बांबूमध्ये असल्याचे महाप्रबंधक राव यांच्या निदर्शनास आणून दिले.
महाप्रबंधक राव यांनी बायाेमास ज्वलनासंबंधी केंद्राचे अध्यादेश प्राप्त झाल्याचे सांगन पुढे म्हणाले की, साेलापूर एनटीपीसीमध्ये पूर्ण क्षमतेवेळी दरराेज 20 हजार दगडी काेळसा ज्वलन हाेते. त्यापैकी दाेन हजार मेट्रीक टन बायाेमास आम्ही जाळू शकताे. फ़क्त हा बायाेमास चार हजार उष्मांक असणारा हवा आहे. जर उष्मांक कमी असेल तर त्याप्रमाणे बायाेमासला मिळणारा परतावा कमी हाेणार आहे. ज्या बायाेमासचा उष्मांक जास्त तितकाच त्याचा परतावा जास्त दिला जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.
एचआर जीएम श्रीनिवास मूर्ती म्हणाले की, यासंबंधीची टेंडर प्रक्रिया ही आमच्या केन्द्रीय कार्यालयातून राबविली जाणार आहे. याच्या खरेदीसाठीही उत्तरप्रदेशच्या धर्तीवर पुरवठादार संस्थांकडून टेंडर मागविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जर आपल्या परिसरातील शासकीय नाेंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्थांनी याचे टेंडर भरुन बायाेमास पुरविला तर याचा स्थानिक शेतकèयांना लाभ मिळू शकताे, असेही त्यांनी सांगितले. डीजीएम गुरुदास मिश्रा यांनी बायाेमास वापराच्या नितीची माहिती दिली.


यावेळी पाशा पटेल यांच्यासमवेत सेंद्रीय शेतीचे शेतकरी अंकुश पडवळे, मारापूर (मंगवळेढा)चे शेतकरी हरी यादव, साेलापूरचे संताेष माळी आदींची उपस्थिती हाेती.
या भेटीनंतर माध्यमाशी प्रतिक्रिया देताना बांबूमॅन पाशा पटेल म्हणाले की, साेलापूर एनटीपीसीने बायाेमास ज्वलनास सुरूवात केल्यानंतर साेलापूरच्या शेतकèयांना माेठी संधी उपलब्ध हाेणार आहे. अत्यंत साेप्या पध्तदीने बांबूपासून पिलेट्स बनवून ज्वलनास तयार केले जाते. शेतकèयांनी शेतकरी उत्पादक कंपनी बनवून हा पुरवठा केल्यास याचा शेतकèयांना माेठा ायदा हाेऊ शकताे. एकट्या साेलापूर एनटीपीसीला वर्षाला लागणाèया सहा लाख 40 हजार बायाेमासचा पुरवठा करायचा म्हंटला तरी साेलापूर जिल्ह्यातील 17 हजार एकरावर बांबू लागवड करावी लागणार आहे. बांबू हे पीक लावल्यास चाैथ्या वर्षांपासून कापायला येते आणि पुढची चाळीस ते शंभर वर्षे आपल्या शेतात राहते. शुन्य आंतरमशागत, झिराे बजेट कामगार खर्च आणि ऊसाच्या दहा टक्के पाण्यात येणारे आणि चार ते पाच हजार रुपये टन भावाने विकले जाणारे बांबू पीक साेलापूरच्या शेतीचे अर्थचक्र बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *