BIG9NEWS Network
ब्रिटिश काळात काही समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून तारेच्या कुंपणात ठेवले असताना देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिनांक 31 ऑगस्ट 1952 रोजी सोलापूरला येऊन या समाजाला तारेच्या कुंपण तोडून मुक्त केले.त्या दिवसापासून हा दिन विमुक्त दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या विमुक्त दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी व विमुक्त भटक्या जाती जमाती समाजाचा निर्धार मेळावा दिनांक 31 ऑगस्ट 2021रोजी घेण्यात आला आहे.त्यास कैकाडी पामलोर,कोंचिकोरवी समाजाने ओबीसी निर्धार मेळाव्यास जाहीर पाठिंबा दिला .
ओबीसी व विमुक्त भटक्या समाजाचे सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्याने सर्व समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे ते आरक्षण अबाधित रहावे म्हणून ओबीसी व विमुक्त भटक्या समाजाचा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी सोलापूरातील कैकाडी,पामलोर,कोंचिकोरवी समाजातील प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्त्यांची सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत गायकवाड होते.तर प्रमुख अतिथी नागेशअण्णा गवळी,माजी पोलीस उपअधिक्षक नागनाथ गायकवाड उपस्थित होते.या बैठकीत मेळावा यशस्वी करण्यासाठी व आपापल्या समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले. निर्धार मेळाव्यास जाहीर पाठिंबा देण्याचे पत्र निर्धार मेळाव्याचे निमंत्रक श्री शरद कोळी यांना देण्यात आले.यावेळी निमंत्रक शरद कोळी यांनी भटक्या-विमुक्त समाजावर होत असलेलाअन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सर्व समाज बांधवांनासह या निर्धार मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित ठेवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी भारत जाधव, देविदास गायकवाड,डॉ. प्रकाश माने, दीपक माने, माजी पोलीस उपअधीक्षक नागनाथ गायकवाड, प्रा. राजेंद्र जाधव,शंकर जाधव, रमेश अशोक मादगुंडी,भरतअप्पा ढेरबेर, हिरालाल ढेरबेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या बैठकीस कैकाडी-पामलेर-कोंचिकोरवी-ढेरबेर समाजाचे अमोल गायकवाड,पवन गायकवाड,भालके,शंकर गायकवाड, अनिल अंबादास गायकवाड राजन जाधव,विजय जाधव,अंबादास जाधव,दशरथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते…
Leave a Reply