Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तहसीलदारास दमदाटी करून पैसे मागून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यातील हकीकत अशी की दिनांक 23/12/2022 रोजी मोहोळचे तहसीलदार हे त्यांच्या शासकीय कार्यालयात कामकाज करीत असताना वैभव जावळे नामे युवक त्यांचे कार्यालयात येऊन मोहोळ तालुक्यात किती अवैध गौण खनिजे उत्खनन चालू आहे त्यावर तुम्ही कारवाही का करत नाहीत त्यामुळे तुम्ही 50,000 रुपये द्या नाहीतर आम्ही तुमचे विरोधात आंदोलन करू व नागपूरचे अधिवेशनात तुमच्या विरोधात आंदोलन करू असे म्हणून मोहोळ तहसीलदार यांच्या विरोधात सोशल मीडियावर खोट्या बातम्या देऊन बदनामी करून त्यांची व त्यांच्या कार्यालयाची बदनामी करून त्यांचे शासकीय कामात अडथळा आणला व वेठीस धरून पैशाची मागणी केली, अशा आशयाची फिर्याद मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून शहराध्यक्ष अजित कुलकर्णी याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज केला होता.सदरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी एडव्होकेट रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस एडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात सदर गुन्ह्यात काहीही जप्त करण्याचे नाही,अर्जदार आरोपी हा तपासकामात सहकार्य करेल,तो कोठेही पळून जाणार नाही,
असे मुद्दे मांडले,ते ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 15,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदारतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे पी.एन.दाभोळकर यांनी काम पाहिले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *