लिंगायत समन्वय समितीच्या वतीने प्रा. आप्पासाहेब पुजारी यांचा सत्कार

Big9 News

सोलापूर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास मंगळवेढ्याचे बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी 50 हजार रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.अध्यासन केंद्रास दासोह केल्याबद्दल अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी चन्नवीर भद्रेश्वरमठ लिखित लिंगायत स्वतंत्र धर्मचं हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.कलबुर्गी केंद्रीय विद्यालयाचे प्रमुख डॉ.बी.बी.पुजारी, डॉ.भीमाशंकर सिंदगी,सुरेश वाले आदी उपस्थित होते.