Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुधारित आदेश लागू केले आहेत. ज्यामध्ये कोरोना विषाणूने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा संशयित रुग्णांना
महानगरपालिकेकडून Institutional Quarantine (संस्थात्मक विलगीकरण) करण्यात येते परंतु,महानगरपालिकेच्या सेवेच्या ऐवजी काही व्यक्ती त्यांना ज्या कालावधीसाठी क्वारंटाईन (Quarantine)
होण्याचा सल्ला देण्यात येतो. त्या कालावधीसाठी स्वखर्चाने हॉटेल्समध्ये (Quarantine) होण्याची तयारी दर्शवितात. त्यांच्यासाठी पेड क्वारंटाईन( Quarantine) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोलापूर हॉटेल असोसिएशन यांनी विनंती अर्ज करुन आपल्या हॉटेलमधील रुम उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आहे.

वैद्यकिय अधिकारी यांनी Quarantine होणेसाठी दिलेल्या कालावधीत ज्या व्यक्तींची स्वखर्चाने अलगीकरण / विलगीकरण (पेड क्वारंटाईन) होण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर हॉटेल मध्ये ‘पेड क्वारंटाईन’ होणेस परवानगो देणेत येत आहे.

स्वखर्चाने अलगीकरण / विलगीकरण (पेड क्यारंटाईन) होण्याची इच्छा आहे. अशा व्यक्तीसाठी मार्गदर्शक सूचना संबंधित रुग्णांवर व हॉटेल व्यवसायिकावर बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायिकांनी त्यांचे हॉटेल मध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा दैनंदिन तपशिल सोलापूर महानगरपालिकेच्या कोविड-१९ कंन्ट्रोल रुम ccsmc२०२०agmail.com या ई मेल आयडीवर पाठविण्याचा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हॉटेलमधीन उपलब्ध सुविधेबाबत व इतर मार्गदर्शक सूचनाबाबतचा फलक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *