सोलापूर | कट्टर भाजप नेत्यावर पक्षाने सोपविली नवी जबाबदारी

Big9news Network

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष पदी माजी विरोधीपक्षनेते नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते नवी पेठ येथील कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.

हि जबाबदारी पार पाडत असताना आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी समाज भाजपा मध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिश्रम कराल असा विश्वास भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

येणाऱ्या काळात ओबीसींवर होणारा अन्याय अबीसींच्या राजकीय आरक्षणाला लागलेला जो धक्का आहे किंवा ओबीसींना वगळून ज्या निवडणुका होत आहे त्या होऊ नयेत व ओबीसी समाजाला एकत्रित करून संघटित करून मुख्य प्रवाहात आनून जास्तीत जास्त ओबीसी समाजाला पक्षाच्या ध्येय धोरणाबरोबर जोडणं यासाठी येणाऱ्या काळात संघटनात्मक काम करेन अशी प्रतिक्रिया माजी विरोधीपक्षनेते नरेंद्र काळे यांनी बोलताना दिली.

यावेळी सभागृनेते शिवानंद पाटील, नगरसेवक संजय कोळी, संजय कणके, राजकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी, भय्या बनसोडे, विनोद मोटे, केदार पुजारी, राज बंडगर, शिवराज पवार, शंकर बंडगर, नागेश खरात, उमेश कोळेकर, दत्ता बडगू, शेखर इगे आदी उपस्थित होते.