MH 13 News Network
राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतन संबंधीत समस्या आणी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी व अडचणीचे निराकरण करण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत निवृत्तीवेतन धारकांकडून 55 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यातील काही प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात आला असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी स.र.मोमीन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृहात आज पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीस महालेखापाल, मुंबई या कार्यालयातील वरीष्ठ लेखाधिकारी श्रीमती मिना कुंदनानी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार तहसीलदार अंजली कुलकर्णी, महालेखापाल, मुंबई या कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी श्री. माने, श्री. शेजाळ, अप्पर कोषागार अधिकारी र.रा. वाळुजकर तसेच सोलापूर जिल्हयातील पेन्शनर्स संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
कोषागार कार्यालय सोलापूर येथील निवृत्ती वेतन शाखेतील कामकाज, निवृत्तीवेतन धारकांना
देण्यात येणा-या सोयी सुविधा व राबविलेल्या उपाययोजना यांची माहितीही यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी स.र.मोमीन यांनी यावेळी दिली. तसेच वरीष्ठ लेखाधिकारी मिना कुंदनानी यांनी निवृत्तीवेतनाचे प्रस्ताव महालेखापाल, मुंबई यांना कसे अचुकपणे सादर करावेत या बाबतची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार जिल्हयामध्ये पेन्शन अदालत अयोजीत केल्या बद्दल महालेखापाल, मुंबई यांचे व कोषागार कार्यालयाचे अभिनंदन केले
यावेळी आदालतीत निवृत्तीवेतन धारकांकडून 55 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधील काही प्रकरणांचा तेथेच निपटारा करण्यात आला. काही अर्जाचे निराकरण 15 दिवसाचे आत करण्यात येईल असे. महालेखापाल, मुंबई यांचे पथकाकडून यावेळी सांगण्यात आले. या अदालतीत पेन्शर्नस संघटना पदाधिकारी, जिल्ह्यातील पेन्शनर्स तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख होते.