PHOTO | वॉटर ब्लॉक ; अक्कलकोट रोडवर ; ‘या’ संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

विष्णू माने / सोलापूर

संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम सुरू आहे,काल मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. सोलापूर अक्कलकोट रोडवरील वॉटर ब्लॉक झाल्याचे दिसून येत आहे.
वीर तपस्वी शाळा ते एमआयडीसी भागात आज बुधवारी दुपारी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या एसटी बसेस मध्ये अडकून पडल्या होत्या. ट्रॅक्टरच्या मदतीने आणि युवकांनी धक्का मारून गाडी सुरू केली.


या भागातील पादचारी आणि दुचाकी धारकांची मोठी ससेहोलपट झाल्याचे दिसून आले या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम केले नसून पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध केली नाही. त्यामुळे या भागात पाणी साचले आणि लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनाचा पाठपुरावा करून महामार्गाच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय छावा संघटनेचे संजय पारवे आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.