शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात काल अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर काल मध्यरात्रीपासून माढा शहरांमध्ये संततधार सुरु झाल्याने बळीराजा मध्ये काही प्रमाणात दिलासा तर काही नुकसान असल्याचे चिन्ह माढा परिसरात निर्माण झाले आहे .शहरात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसून आले आहे .काहींच्या मते माढा शहरात प्रथमच एवढा मोठा पाऊस झाल्याचे सांगण्यात येते.
दुपारपर्यंत संततधार थांबलेली नव्हती. असाच पाऊस चालू राहिला तर परिसरातील बळीराजाला मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. श्रीराम नगर भागातील काहींच्या घरात तर अक्षरशः पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. सध्या ढगफुटी झाल्याचे चित्र माढा शहरात निर्माण झाले आहे.
माढा शहर व तालुक्यात सर्वदूर पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरातील सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
Leave a Reply