PHOTO | NDRF च्या मदतीने होतेय जलप्रकोपातून सुटका

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठी दाणादाण उडवली. मागील शंभर वर्षात अशा प्रकारचा जलद प्रकोप पाहिला नाही असे सार्वत्रिक बोलले जात आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, शिवणी, पाकणी आणि तेलगाव येथे पुराच्या पाण्याने हाहाकार घातला असून बरेच लोक अडकले होते. महसूल व पोलिस प्रशासन यांच्या प्रयत्नाने NDRF च्या 2 तुकड्या बोटसह दाखल होऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या गावात अडकलेल्या ८५ वर्षीय वृध्द महिलेसह ५ वर्षीय मुलाला नदीपात्रातून बाहेर काढण्यात NDRF ला यश आलेय. सीना नदीच्या पात्रात जवळपास १० लोक अडकले होते. त्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलेय.