MH13 News Network
मोहोळ येथे दत्त मंदिर जवळ पुर्व वैमनस्यावरून राजेश उर्फ राजाभाऊ जाधव यास व त्याच्या पत्नीस मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून पुनम नानासाहेब रेवडकर रा. मोहोळ हिचे विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात तिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी पूनम रेवडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपी पूनम रेवडकर ही मोहोळ कोर्टाच्या समोर असलेल्या दत्त मंदिर जवळ गेली असताना आरोपी पूनम रेवडकर हिने फिर्यादीच्या पत्नीस व फिर्यादिस मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली या आशयाच्या फिर्यादीवरून पूनम रेवडकर हिच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता. सदर निर्णयाविरुद्ध आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी पक्षा तर्फ़े न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरणातील फिर्यादीने घटने दिवशी आरोपी पूनम रेवडकर हिचा विनयभंग केलेला होता. याबाबत तिने मोहोळ पोलीस स्टेशनला फिर्याद देखील दिलेली होती. या घटनेस शह देण्यासाठी फिर्यादीने तिला या खटल्यात खोटेपणाने गुंतविले आहे व या घटनेबद्दल फिर्यादीच्या पत्नीने आरोपी पूनम रेवडकर हिच्या विरोधात पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत कोणताही उल्लेख नाही ही बाब आरोपी पक्षाच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रानवरून सिद्ध होते .
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने , ॲड. विलासीनी बी यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. आर. आगरकर व मुळ फिर्यादीतर्फे ॲड. ठाकुर यांनी काम पाहिले.