- MH 13 News Network
चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वन विभागाची कारवाई
30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
सोलापूर – मौजे. मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती वन विभागास मिळाली. त्या अनुषंगाने घटनास्थळी जावून तात्काळ पाहणी केली असता विना नंबर प्लेट वाहनाद्वारे चंदन लाकूड वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. यामध्ये 20 लाख रुपये किंमतीचे चंदन व एक नवीन बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभाग जप्त केला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दिपक खलाणे यांनी दिली.
मौजे. मंद्रुप ते कंदलगाव रस्त्यावर चंदन लाकडाची अवैध वाहतुक करताना आरोपी हिराप्पा परशुराम भोसले, परशुराम हुबळी भोसले रा. दोघे घाडगेवस्ती मु.पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर, रमेश चन्नप्पा भोसले रा. मंगळवार पेठ, परीट गल्ली, मिरज ता. मिरज जि. सांगली सद्या रा. घाडगेवस्ती मु.पो. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर यांना ताब्यात घेतले असून. सदर आरोपीनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42 व 52 अन्वये तसेच महाराष्ट्र वननियमावली 2014 चे कलम 37,41,47 व 55 चे उल्लंघन केलेले आहे. सदर आरोपीवर वनगुन्हा नोंदविला असून पुढील तपास वनपाल शशिकांत एकनाथ सावंत करीत आहेत. सदर कारवाई सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील व सहा. वनसंरक्षक (रोहयो). लक्ष्मण आवारे यांचे मार्गदर्शनाखाली केली असून त्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पं. खलाणे, वनपाल शशिकांत ए. सावंत, शंकर भि. कुताटे वनरक्षक तुकाराम म. बादणे, अनिता सि. शिंदे, गंगाधर कणबस, वाहनचालक कृष्णा निरवणे, आनंद भडकवाड व नितीन चराटे यांचे पथकाने कारवाई केली.