Big9news Network
शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत कोरोना कहर होत असताना दिसत आहे.
माढा तालुक्यात दिवसेंदिवस संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज तब्बल 183 जण कोरोना बाधित असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
हा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाचा प्रकोप टाळावा असे आवाहन वारंवार प्रशासनाकडुन केले जात आहे. आज माढा तालुक्यात 183 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे तर रुग्णालयातून बरे होऊन घरी 106 जण गेले असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी थोरात यांनी सांगितले.
आज मंगळवारी दि.20 एप्रिल रोजी…
तालुक्यातील या गावात रूग्ण वाढ झाली आहे –
माढा 1,कुर्डुवाडी 9,चांदज 17,टेंभुर्णी 22, मोडनिंब 13रोपळे (क) 1,कव्हे 1,महादेववाडी 2, बारलोणी 1, बीटरगाव 3,भोसरे 3,म्हैसगाव 2, रिधोरे 2,तांदुळवाडी 1,जामगाव 1,खैराव 2,दारफळ 2 ,निमगाव (मा) 8,उपळाई बु1,रोपळे खु1,चिंचोली 3,कुंभेज 3, वडाचेवाडी (तम) 3,जाधववाडी 2,तुळशी 7,अरण 3,सोलंकरवाडी 1,बावी 3,लऊळ 3,परिते4,परितेवाडी 2,घोटी 3,वेणेगाव 1,बेंबळे 1,वरवडे 4,व्होळे खु 3, अकुंभे 2, आहेरगाव 2, पिंपळनेर 7, निमगाव टे 2, उपळवटे 3,कुर्डु 3,जाखले2, अकोले खु 3, कन्हेरगाव 6,शेवरे 2,आलेगाव खु1,रूई 7,आढेगाव 3,शिराळ टे1 तालुक्यातील या 50 गावात आज रूग्ण वाढ झाली आहे.
Leave a Reply