उदगीर
कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलखता उपक्रम वर्ष-२०२४ डिगोळ येथे विविध उप्रकमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला जात आहे. हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगक संलझता उपक्रम संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून डिगोळ गावामध्ये जाऊन कृषिटूतांनी शेतीशी संबंधितची माहिती शेतकऱ्यांना दिली. सर्वप्रथम Agrovan, E- Pic Pahani, Agro star, Plantix इत्यादीची माहिती शेतकऱ्यांना दिली व प्रत्यक्षरीत्या शेतात जाऊन शेतकऱ्याना व Plantix APP व Agro Star चा वापर करून दाखवला. यावेळी सहभागी विद्यार्थी प्रदीप कनडुकरी, प्रसाद कांबळे, सुरज जाधव, समर्थ जगताप, शुभम जगताप, ओम हनमे, अक्षय डोके व गावातील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.पी. सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए. एम पाटील, कार्यक्रम समन्वय डॉ. एस. एन वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. माने, विशेष विषयतज्ञ डॉ. के. पी. जाधव व प्रो. बी.बी. निमनवाड व प्रपुल सोळके यांचे विशेस मार्गदर्शन लाभले.