Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर शहरातील सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणांतून गहाळ झालेले १३ मोबाइल पोलिसांनी शोधून काढले. यात एकूण १ लाख ६५ हजारांचे १३ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर बझार पोलिस ठाणे हद्दीतील मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना नोंद झाल्या होत्या. या प्रकरणी मोबाइलचा तपास करताना डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे वरील मोबाइल शोधले. ते मोबाइल मूळ मालकांना सुपुर्द करण्यात येत आहेत. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोपटराव धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. सचिन माळी, औदुंबर आटोळे, इसाक नदाफ, रफिक इनामदार, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, सागर सरतापे, अय्याज बागलकोटे, राम भिंगारे, विठ्ठल काळजे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अबराज दिंडोरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *