Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

MH13 News Network

दशसुत्री उपक्रमाचे चांगले परिणाम
………………….

सोलापूर – शिक्षण विभागाचे माध्यमातूव राबविलेल्या दशसुत्री उपक्रमाचे परिणाम समोर येत आहेत. अक्कलकोट तालुक्यांतील सलगर येथील प्राथमिक शाळेने दिलीप स्वामी विद्यार्थी बचत बॅंक सुरू करून एक नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला आहे. यामुळे लहान वयात बचतीची सवय विद्यार्थ्यांना लागणार आहे. या बचत बॅंकेचा शुभारंभ आज सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला.
जिल्हा परिषदे मध्ये सिईओ यांचे दालनात सलगर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी बचत बॅंकेचे पासबुक चा शुभारंभ करणेत आला. पासबुक वर सही व शिक्का मारून औपचारिक पणे बचत बॅंकेचा शुभारंभ करणेत आला.या प्रंसगी अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी संजय जावीर, सलगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार , उपमुख्याध्यापक श्री. हणमंतराव गुंडरगी, उपशिक्षक श्री. मल्लिनाथ चनपटणे, पदवीधर शिक्षक श्री. दिनकर भारती उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात शिक्षण विभागाचे माध्यमातून दशसुत्री उपक्रम राबविला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेमुळे त्यांचे चांगले परिणाम शाळा मधून दिसून येत आहेत. याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुक्यांतील सलगर येथील प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थीची गरज ओळखून बचत बॅंक सुरू केली आहे. सिईओ स्वामी यांनी सुरू केलेल्या दशसुत्री ची प्रेरणा घेतली असल्यामुळे त्यांनी “दिलीप स्वामी विद्यार्थी बचत बॅंक” सुरू केली आहे.

अशीही आहे विद्यार्थी बचतबॅंक
………………………..
विद्यार्थी बचतबॅके साठी सर्व विद्यार्थी यांचे शाळेत च खाते उघडणेत आले आहे. प्रत्येक विद्यार्थी यांना बॅंक पासबुक देणेत आले आहे. त्यांवर त्या विद्यार्थ्यांला फोटो चिटकविणेत आला आहे. फोटो व पासबुक वर गोल शिक्क तयार करणेत आला आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयात बचतीचे संस्कार व्हावेत हा या पाठी मागचा उद्देश्य आहे. शाळेत कॅशबुक ठेवणेत आले आहे. संगणकावर प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद राहणार आहे.

सलगर शाळेचा पथदर्शी उपक्रम – सिईओ दिलीप स्वामी

अक्कलकोट तालुक्यातील सरगल शाळेचा विद्यार्थी बचत बँकेचा उपक्रम हा पतदर्शी असून हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. विद्यार्थ्यांना बचतीची सवय यामुळे लागणार आहे. शिक्षकांनी बॅंकेस माझे नाव दिले बद्दल आभार व्यक्त केले. दशसुत्री चे चांगले परिणाम समोर येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना बचतीची सवय हवी – मुख्याध्यापक पोतदार

सलगर शाळेत एकूण २३९ विद्यार्थी आहेत.
इ. ५ वी ते ७ वी साठी बचत बँक सुरू करणेत आली आहे. या बॅंके साठी ९२ विद्यार्थीची पासबुक काढणेत आली आहेत. पासबुक प्रिंट करून घेणेत आली आहेत.
संकल्पना उद्दिष्ट्ये- विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी. विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार बद्दल माहिती मिळावी. बचत बँकेचे पदाधिकारी यांची निवड लोकशाही पद्धतीने मतदानातून निवड करणे.
करणेत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *