Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती देत येत्या सोमवारपासून 24 जानेवारी राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत.

शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आज निर्णय होणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *