Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

खारघर येथे होणार महाराष्ट्र भूषण सोहळा
ज्येष्ठ निरूपणकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार,पद्मश्री भूषण डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाच्या वतीने यंदा 2023चा वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 16 एप्रिल रोजी मुंबई येथील खारघर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास बैठकीतील सदस्य लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे त्यांनी बैठकीत बसणारा प्रत्येक सदस्यांची पिंडातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न निरूपणाच्या माध्यमातून केला आहे.त्यांनी समाजातील प्रत्येक कुटुंबात स्थैर्य सुख समाधान शांती, निरुपणाच्या माध्यमातून प्रत्येक सदस्यांच्या मनात उभी केली व्यसनी मनुष्य निर्व्यसनी कसा होऊ शकतो याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री बैठकीतील सदस्य, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सुजान नागरिक घडवण्याचा प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी केला आहे

लहान मुलांवर बाल संस्कार केंद्र सुरू करून उद्याचा उत्तम नागरिक बनवणे वसा आप्पासाहेबांनी हाती घेतला आहे. आदिवासी विभागातील समाज प्रबोधनाची कार्य त्यांनी केले. वृक्षारोपण स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले आहे आज आपण एक जरी उत्तम बी पेरलं तर उद्या नक्कीच ते फळही उत्तम असणार आहे. हे निरूपणांच्या माध्यमातून प्रत्येकाला घडवल आहे.

आप्पासाहेबांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी या परमार्थाचा पाया रचून गुढी उभारली, आज आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुढची पिढी डॉ.सचिन दादा धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने ही धुरा सांभाळून त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे.लाखो दास भक्तांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा खारघर येथे  संपन्न होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *