Big 9 News Network
नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळतीमुळे बावीस जण दगावले आहेत. आज बुधवारी दुपारी ही घटना घडली.
नाशिकच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.ऑक्सिजन अभावी 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली तर जवळपास तीस ते पस्तीस रुग्ण दगावले असू शकतात असे समजते.
या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
यासंदर्भात माध्यमांशी बोलतांना आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे म्हणाले, “नाशिकमध्ये ऑक्सिजनचा लिकेज झाला. हा किरकोळ लिकेज होता. त्यामुळे ऑक्सिजन वाया गेला नाही. लिकेज लक्षात येताच त्वरित थांबण्यात आला. यासंदर्भात मी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. तंत्रज्ञाचा वापर करुन हा लिकेज त्वरित थांबवण्यात आला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
नाशकातील डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. यावेळी या टाकीत ऑक्सिजन भरत असताना अचानक ऑक्सिजन लिक झाल्याने सर्वत्र रस्त्यावर पसरला.
ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अन्न व सुरक्षा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगाणे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून जे या घटनेसाठी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या रुग्णालयात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत आहे.