Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोनारी परंडा तालुक्यातील धाराशिव येथे  काळ भैरवनाथ जोगेश्वरी देवाचा मानाचा रथोत्सव जल्लोषात पार पडलाय. भाविकांची अलोट गर्दी जमली होती भैरवनाथाच चांगभलं चा जयघोष करीत महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून  लाखो भाविक प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सहभागी होते. गुलाल खोबऱ्याची उधळण करत,सोनारी काळ भैरोबाचं चांगभलं चा जयघोष करीत भाविक भक्त सहभागी होतात.  भाविक भक्तीपूर्वक उत्साहात रथयात्रेत उपस्थित होते. 16 तारखेपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा समारोप श्री भैरवनाथ   रथोत्सवाने होतो. या ठिकाणी सिद्धनाथ गादीचे दर्शन अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

भक्तगण आपल्या कुटुंबासह आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेऊन आपली नवस पूर्ण करण्यासाठी जातात. भक्तांच्या नवसाला पावणारा सोनार येथील काळभैरवनाथ मंदिराकडे पाहिले   जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *