तहसील प्रशासनाच्या वतीने गायक मोहंम्मद अयाज यांचा सन्मान!

Big9 News

नुकतेच महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या मंद्रुप येथील भुमीपुत्राचा सन्मान तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आला. पहाटे पाव बटर विकुन दिवस भर बस स्थानक वर लिंबू सरबत घ्या म्हणून आपल्या सुरेल आवाजात गावकऱ्यांना आकर्षित करत मीळेल ते काम करत आपल उदरनिर्वाह करणारे मोहम्मद अयाज हे शेतामध्ये गुरे ढोरे सांभाळत संगीताची साधना केली .

शास्त्रीय संगीता शिकण्याची ऐपत नसल्याने ते मोहम्मद रफी लता मंगेशकर आशा भोसले यांना गुरुस्थानी मानत . रेडिओ वर गाणी ऐकुन ऐकुन सराव करत राहीले संगीत साधना करत करत तो एकलव्य गायक म्हणून त्यांचा उदय झाला अन पुढे महाराष्ट्राचा महागायक झाला विशेष म्हणजे अयाज यांच्या आवाजावर मंगेशकर परिवारातील आशाताई भोसले, उषाताई मंगेशकर, पंडीत ह्दयनाथ मंगेशकर यांनी कृपा दृष्टी दाखवली ही बाब एक स्वप्नासारखीच. अयाज वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्या वर आपली कला सादर करुन देशभरात नाव लौकीक केले. आज ते संगीत क्षेत्रातील जवळ जवळ सर्वच दिग्गज कलावंतां सोबत अयाज यांनी काम केले आणी या सर्व कलावंतांनी न्याय दिला . संगीताच्या माध्यमातून जगभरात आपले व आपल्या मंद्रुप सोलापूर च नांव लौकिक करत आहेत .

अयाज यांना हारुन आवटे नजीर आवटे व डॉ जमादार सारखे अनेकांनी प्रोत्साहीत केले आणी 1 में महाराष्ट्र कामगार दिनाच्या दिवशी मोहम्मद अयाज यांचा तहसील कार्यालयात जोरदार सत्कार करण्यात आला या वेळी आमदार सुभाष बापू देशमुख, तहसीलदार राजशेखर लींबारे, पोलिस निरीक्षक मांजरे सह गावकरी उपस्थित होते.

मोहम्मद अयाज यांनी तहसीलदार लींबारे सह सर्व पदाधिकार्याच आभार मानले.