Big9 News
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविल्या प्रित्यर्थ माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी व माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जेमिणी माता मंदिरात महाआरती करून,जल्लोष साजरा करण्यात आला व उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी सर म्हणाले की,लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय प्राप्त झाल्याप्रित्यर्थ कार्यकर्त्यांमध्ये नवं ऊर्जा मिळाली असून,याच जोरावर येणाऱ्या सोलापूर बाजार समिती मध्ये देखील भ्रष्टाचार मुक्त करून,भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचे काम येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार आहोत असे सांगितले
माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी बाजार समिती दहशत मुक्त व भ्रष्टाचार मुक्त केली असून येणाऱ्या काळात आम्ही सोलापूर बाजार समितीत देखील भाजपचा झेंडा रोवणार असून सर्व भाजप कार्यकर्त्यांची वजरमुठ बांधून येणाऱ्या काळात काम करणार असल्याचे संकेत दिले
या जल्लोष व महाआरती प्रसंगी माजी सरचिटणीस हेमंत पिंगळे,बसवेश्वर मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती,भाजयुमोचे सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने,बिपीन पाटील, यतीराज होनमाने,शिलवंत छपेकर,सतीश पारेली,ओंकार होमकर,महेश हगरगुंडगी,विनोद गडगे,रोहित दहिटने,अर्जुन मोहिते,सागर खांडेकर,सोमनाथ पाटील,प्रथमेश कोरे,बसवराज जाठगल बंडोपंत डोळे माळपा कर्ली अप्पू उळगड्डे लिंगम मोलकल बसलिंगप्पा कर्ली युवा नेते बिपीन भैय्या पाटीलप्रवीण कैरमकोंडा यल्लप्पा कर्ली विजय कोळी कुमार शिरसगीकर संदीप पाटील महेश मल्लूरे स्वामी वरगनटी दिपक कर्ली विकी जाठगल शिवू मंदकल राहुल संकाराम प्रशान्त कलशेट्टी दिनेश पाटील रेवन वगुर सिद्दु कर्ली व्यंकटेश जाठगल सिद्राम यलदडी भीमा गंधाळ अंबादास पाटील गुंडू कलशेट्टी प्रभू कोळी प्रवीण डोळे नागेश कोळी अण्णा समर्थक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते
Leave a Reply