Big9 News
सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांसाठी सेतू सुविधा केंद्र चालवण्यात येते त्यांना तातडीने सुविधा उपलब्ध होत होती परंतू मुदत संपल्या कारणाने शासनाकडून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेतू सुविधा केंद्र चालू करावे असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेले हे मध्यवर्ती ठिकाणी व सोयीचे असल्याने सर्व सामान्य लोकांना याचा फायदा होत होता परंतू या निर्णयामुळे सर्व सामान्य लोकांना नाहक त्रास होत आहे. विविध दाखल्यांसाठी खाजगी लोकांकडे जावे लागणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे, तसेच कागद पत्रांची बोगसगिरी पण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करून तातडीने सेतू सुविधा केंद्र चालु करुन सर्व सामान्य लोकांना सहकार्याची भूमिका ठेवावी. आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याला विनंती करतो की तातडीने आदेश काढून सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे. अन्यथा या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी दिला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, ज्योतिबा गुंड, महेश कुलकर्णी, मुस्सा अत्तार, ऋषीकेश शिंदे, विकास शिंदे, शरद येच्चे आदी लोक उपस्थीत होते