Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

लोणावळा कार्यशाळेत
सिईओ दिलीप स्वामी यांचे दमदार सादरीकरण

सोलापूर सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून शिक्षण विभागात राबविलेले विविध नाविण्यपुर्ण उपक्रमास पुणेतील शिक्षण परिषदेच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिईओ दिलीप स्वामी यांनी सादरीकरण करून सर्वांची वाह..वा मिळविली. दशसुत्री व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाने शिक्षण परिषदेत बाजी मारली.
राज्याच्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांची दोन दिवशीय निवासी कार्यशाळा लोणावळा येथील अॅम्बे व्हॅली सिटी येथे आयोजन करणेत आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे प्रमुख उपस्थित होते. या परिषदेचे साठी सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध उपक्रम राबविले बद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप यांना खास निमंत्रण देणेत आले होते.सोलापूर हून माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय जावीर, डाॅ. रामचंद्र कोरडे, सुलभा वठारे प्रमुख उपस्थित होते.
राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दोघेही सोलापूर जिल्ह्याचे दौरावर आले असता त्यांनी या उपक्रमाचे कोतुक केले होते. आज लोणवळा येथील कार्यशाळेत त्यांनी सविस्तर सादरीकरण ऐकून दोघेही भारावून गेले.

लोकसहभागातून राबविलेले सायकल बॅंक व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमा बरोबर शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविणारा दशसुत्री या उपक्रमाचे दमदार सादरीकरण सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. प्रत्येक पत्राचा ड्राफ्ट स्वत बसून लिहून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजन, अंमलबजावणी त्या मधीस त्रुटींची पुर्तता व अभियान पुर्ण होई पर्यंत पाठपुरावा या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्या. शिक्षक व अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केले मुळे हे शक्य झाले असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

शिक्षण परिषदे मध्ये लोकसहभागाचे कौतुक…!

स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी व मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक यांनी सात कोटी पेक्षा अधिक रक्कम जमवून कोरोनाच्या काळात केलेल्या या कामाचे कौतुक करणेत आले.

सायकल बॅंकेने मारली बाजी..!

ज्या योजनांना शासनाचा निधी नाही. परंतू गरीब मुलींची हेळसांड होऊ नये या उदात्त हेतुने राबविलेली सायकल बॅंक या नाविण्य पुर्ण उपक्रमास परिषदेच भरभरून प्रतिसाद मिळाला.

तीन उपक्रमाची होणार राज्यात अंमलबजावणी .!

सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतील सायकल बॅंक, दशसुत्री, स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद चे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज सादरीकरण पाहिले नंतर या उपक्रमाचे सविस्तर प्रस्ताव देणेचे सुचना सिईओ दिलीप स्वामी यांना केल्या. या प्रमुख उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणेत येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *