Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

 

श्री. प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर व श्रीमती नंदिनी हिरेमठ यांना वाहन क्र. आर. जे. 19, जी. बी-5707 या वाहनाची तपासणी करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नांदणी टोल नाका, मंद्रुप येथे उपरोक्त वाहनाच्या तपासणीकामी थांबले असता त्यांना सायं. 05.30 वा. च्या सुमारास उपरोक्त वाहन विजापूर हायवेने येताना दिसला.

सदर वाहनास अन्न सुरक्षा अधिकारी यांनी थांबविण्याचा इशारा केल्यानंतर वाहन चालकाने वाहन बाजुला थांबविले. त्यानंतर सदर वाहनाची अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ सदृष्य वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी,

सदर वाहनामध्ये    पानमसाला असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर वाहन चालकास मुद्देमालासह मंद्रुप पोलिस स्टेशन, मंद्रुप येथे आणले. त्यानंतर सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर यांनी पुढील कारवाई घेऊन वाहन चालक सुमार आलम खान, रा. वडनावा जागेर, ता. पाचपट्टा, जि. बारमेर, राजस्थान व साथीदार रोशन शेरू खान, रा. कोडूला पारोदी, जि. बारमेर, राजस्थान व इतर यांच्याविरुध्द फिर्याद दाखल्‍ केलेली आहे.
सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती नंदिनी हिरेमठ व श्री. प्रशांत कुचेकर तसेच नमुना सहाय्य्क श्रीशैल हिटनळ्ळी, विठ्ठल रहाटे यांच्या पथकाने पुर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *