Study Well | इ. 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पोर्टल

Big9news Network

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू नये म्हणून Study Well नावाने पोर्टल सुरू केले होते. त्याचप्रमाणे या पोर्टलवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या युट्युब चॅनलची लिंक दिलेली होती. या पोर्टलवर पहिली ते दहावीची सर्व क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे चाचणी मालिका दिली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान कक्षामध्ये स्टुडिओची उभारणी करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून काही तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. हे नेमणूक केलेले शिक्षक या स्टुडिओ मध्ये येवून पाठ शिकवत असत. या पाठांचे व्हिडिओ शुटिंग करून ते युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येत होते.

सन 2021 या वर्षभरात या पोर्टलवर 68000 विद्यार्थ्यांनी भेट देऊन या पोर्टलचा ऑनलाइन शिक्षणासाठी लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे या पोर्टलला भेट देण्यात भारताव्यतिरीक्त पाकिस्तान व संयुक्त राष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.