Big9 News
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती ची घोषणा करत पक्षाच्या पदावरून पाय उतार होण्याचे ठरवले. शरद पवारांच्या या घोषणेने सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यासह राजकीय कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. काही ठिकाणी कार्यकर्ते उपोषणाला बसले. तर काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व दोन-तीन दिवस विचार करू असे शरद पवारांनी सांगितले.मात्र आता राष्ट्रवादी पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होत आहे शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे
पक्षातील नेत्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतकेच नाही तर बैठकीनंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होईल
त्यात सुप्रिया सुळे यांचे नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अजित पवारांवर महाराष्ट्राची जबाबदारी सॊपवण्यात येऊ शकते. अजित पवार हे केंद्रात नेतृत्व करण्यात इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे. राज्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व आहे. अजित पवारांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे अजित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय असणार तर सुप्रिया सुळे केंद्रात पक्षाचे नेतृत्व करतील.