Big9news Network
जगातील प्रतिष्ठित समजला जाणारा ‘ग्लोबल टीचर अवाॕर्ड’ प्राप्त करणारे व देशभरातील प्राथमिक शिक्षकांचे icon श्री.रणजितसिंह डिसले यांची समस्त शिक्षक व शिक्षण विभागाची बदनामी व्हावी असे वक्तव्य करणाऱ्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी असे निवेदन देण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी दिली.
नेमके प्रकरण काय..?
पुढील शिक्षणासाठी ग्लोबल टीचर अशी ओळख निर्माण झालेले जागतिक कीर्तीचे शिक्षक रणजीतसिंह डिसले हे पुढील शिक्षणासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यासंदर्भात कागदपत्र पूर्ततेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे त्यांनी अर्ज केला होता.त्यावर शिक्षणाधिकारी लोहार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे सांगितले होते.
आज शनिवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजी यांना परदेशवारी जाण्यासाठी सर्व परवानग्या देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दिले असल्याचे सांगितले. डिसले हे जिल्हा परिषदेच्या शाळेत तीन वर्ष अनुपस्थित राहिल्याचे शिक्षण अधिकारी लोहार यांनी सांगितले होते.त्याची ही माहिती घेतली जाईल असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शिक्षणाधिका-यांनी डिसले गुरुजींचा जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थ्यांना काय उपयोग झाला हे विधानच हास्यास्पद वाटते.जे जगाला कळले ते शिक्षणाधिका-यांना समजू नये ही दुर्दैवी बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप संघटनेने केला आहे.मेडीकल बीले,रजा मंजुरी आदेश, हजर रिपोर्ट देणे, शिक्षकांच्या समुपदेशन बदल्या यामध्ये आर्थिक अफरातफर झाल्याचा दावा पवार यांनी केला आहे . याबाबतची सर्व माहिती कार्यकारी अधिकार्यांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी संवेदनाशील पद्धतीने या सर्व प्रकरणाची माहिती घ्यावी आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात यावी अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
शिक्षणाधिकारी लोहार बेजबाबदारपणे नेहमीच वागतात .परवा मोहोळमध्येही शिक्षणपरिषदेत त्यांचे वक्तव्य सुद्धा वादग्रस्त ठरले होते.डिसले गुरुजी ३ वर्षे गैरहजर होते असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, तर तीन वर्षे शिक्षणाधिकारी व शिक्षणखाते झोपले होते का? का त्यांच्यावर कारवाई यांनी केली नाही?,आपले अपयश गैरप्रकार झाकण्यासाठीच तर हा उपद्व्याप ते करत नसतील का ?
माऊली पवार
समन्वयक
सकल मराठा समाज ,सोलापूर