कहर कोरोनाचा | माढ्यात पुन्हा बाधितांची संख्या वाढली

शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी: महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय योजना करून देखील संसर्ग काही केल्या कमी होत नसताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन दिवसात महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे असे संकेत सरकारच्यावतीने देण्यात आले आहे.

सोलापूर शहरा बरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असून आज दि.13/4/2021 वार मंगळवार माढा तालुक्‍यात तब्बल 106 नवीन कोरोना रुग्ण ची वाढ झाली व 58 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे त्याच बरोबर तालुक्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये टाकळी (टे)1 पुरुष तर चांदज मधील 1 स्त्रीचा समावेश आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात यांनी सांगितले माढा तालुक्यातील या गावात आज रुग्ण वाढ झाली आहे.

माढा 12, कुर्डुवाडी 15,टेंभुर्णी 17 कुर्डु 15, बीटरगाव 1,रिधोरे 1,भोसरे 4,वाकाव 2, चिंचोली 1, उंदरगाव 1,मोडनिंब 3, बावी 2,भुताष्टे 1,भेंड 1,वेणेगाव 2,अकुंभे 1,पिंपळनेर 3,पिंपळखुंटे 2,अकोले (खु) 8 कन्हेरगाव 1, शेवरे 1,दहीवली 3,आढेगाव 2,आलेगाव (बु)3,चांदज 1,जाधववाडी (मा)1,केवड 1,वडशिंगे 1,