Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

हेडफोन घालून रोड ओलांडताना रेल्वे खाली चिरडून जीव गमावला

कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असताना, तरुणाला रेल्वे आल्याचे समजलेच नसल्याचे रेल्वे पोलिसांनी प्रथम दर्शनी दर्शनास आले आहे

रेल्वे पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याचे नाव जयेश किशोर जाधव वय ३२,जुना कासेगाव रोड, पंढरपूर असे असल्याचे समजले

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या दरम्यान मिरज कुर्डूवाडी डेमो रेल्वे गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशन येथून निघाली होती. यावेळी रेल्वे किलोमीटर नंबर ४२८/१,२ ची   रेल्वे लाईन,तरुण  ओलांडून जात होता.या दरम्यान त्याला रेल्वेची धडक बसली

या धडकेत त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून तुटून तो गंभीर जखमी झाला असल्याने,तो जागीच मरण पावला रेल्वे रूळ ओलांडत असताना तो तरुण हेडफोन कानामध्ये घालून असल्याचे प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी रेल्वे पोलिसांना सांगितले पुढील तपास सहाय्यक फौजदार काजी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *