.
हर घर तिरंगा झेंडा’..
सेल्फी फोटो पाठवा…
आकर्षक साड्या जिंका….!
(राज्यस्तरीय स्पर्धा)
———————————————
पद्मशाली सखी संघम आयोजित
———————————————
सोलापूर – केंद्र आणि राज्य शासनांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त देशात प्रशासन स्तरावर प्रत्येक नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत होण्यासाठी ”हर घर तिरंगा झेंडा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच्या अनुषंगाने सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ”पद्मशाली सखी संघमच्या” वतीने महिलांच्या मनातही देशभक्ती बिंबवावे म्हणून ‘तिरंगा झेंड्यासोबत सेल्फी फोटो पाठवा आणि आकर्षक साड्या जिंका.. अशी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्याची माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. माधवी श्रीनिवास अंदे यांनी सांगितले आहे.
जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा साक्षीदार म्हणून यावेळी कमी लोकं असतील. किमान या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सर्वच जल्लोष करतीलच. मग, महिलाही या जल्लोषात सहभाग नोंदवावा, म्हणून फक्त महिलांसाठीच लहान गटांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ही स्पर्धा असून प्रथम ३०००/-रुपयाची साडी, द्वितीय* २००० /-रुपयाची साडी आणि तृतीय क्रमांकासाठी १००० /- रुपयाची आकर्षक साडी देण्यात येईल. स्पर्धेसाठी तिनही साड्या अभया साडी सेंटर तर्फे देण्यात येणार आहे.
*या स्पर्धेसाठी ‘सेल्फी फोटोच’ ग्राह्य धरले जाणार असून,(8788970814 या क्रमांकावर सेल्फी फोटो पाठविणे.) स्पर्धक सेल्फी फोटो पाठवताना नाव लिहणे आवश्यक आहे. सेल्फी फोटो पाठवण्याचे अंतिम मुदत १५ अॉगस्ट असून लगेचच दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल.
आलेल्यामधून ”लकी ड्रॉ” पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त भगिनींनी सहभाग नोंदवावीत, असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा संध्याराणी राहूल अन्नम, सचिवा राधिका गोवर्धन आडम, सहसचिवा जमुना राजीव इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली किशोर व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मीबाई नागभूषण चिट्याल, खजिनदार प्रभावती विवेकानंद मद्दा तर सहखजिनदार ममता नितीन मुदगुंडी यांनी केल्या आहेत.