छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

Big9 News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

       याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली