Big9 News
‘त्या’ उष्माघातात मृत्यू पावलेल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश काल रविवारी नवी मुंबई येथील खारघर मैदानात झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू पावल्यांची संख्या आता बारा झाली आहे. मृत व्यक्तींमध्ये सोलापुरातील दोघांचा समावेश आहे. जवळपास 24 ते 25 जण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू , यात सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश , यातील आठ लोकांची ओळख पटली आहे.
कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी, सोलापूर)
संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा, सोलापूर)
महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा, मेहंदडी)
जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव, मुंबई. मुळगाव श्रीवर्धन)
स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा, विरार)
तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार, पालघर)
भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा, ठाणे)
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातात मृत पावलेले यांची काही नावे समोर आली असून काही जणांची ओळख पटणे बाकी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः श्री सदस्यांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच मृतांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या सोहळ्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींबाबत ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
Leave a Reply