Big9 News
सोलापूर शहरात हातभट्टी दारू विकल्यास डायरेक्ट येरवड्यात पाठवणार: राजेंद्र माने पोलीस आयुक्तालय
शहरातील जेल रोड पोलिस ठाण्याच्या हातभट्टी दारू विक्री संबंधाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार उमेश नामदेव राठोड (वय३९,) रा. मुळेगाव तांडा) याच्यावर १ एप्रिल रोजी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
उमेश राठोड हा त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला होता. स्वतः हातभट्टी दारूची वाहतूक केली आहे तसेच आत्तापर्यंत त्याच्यावर एकूण २० गुन्हे दाखल आहेत.
राठोड याने लोकांना त्याच्या साथीदारांसह उघडपणे शस्त्रासह मारहाण करणे, अशा प्रकारे गुन्हेगारी वर्तन करून परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्यावर पोलिस आयुक्तांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढले आहेत. त्यानुसार त्याची येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस पोलिस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले एमपीडीए व विशेषतः पथकातील अंमलदार यांनी कारवाई केली आहे.