Unlock 4 | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ‘ई’ पास रद्द

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे.
मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

केंद्राने अनलॉक- 4 साठी गाईडलाईन्स घोषित केल्यानंतर आज राज्य सरकारनेही मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती घोषित केल्या आहेत.

या’ गोष्टी सुरु :
▪️ ऑनलाईन तसेच डिस्टन्स लर्निंग
▪️ सामान्य दुकाने तसेच दारुची दुकाने
▪️ हॉटेल, लॉज 100 % क्षमतेने होणार सुरु
▪️ सरकारी कार्यालये ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार
▪️ खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचाऱ्यांसह
▪️ खासगी बस, मिनी बस वाहतुक

या’ गोष्टी बंदच :

सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम,आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो सेवा, सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी गोष्टींवर बंदी कायम आहे.

वाहने :
● टॅक्सी : 1+3 प्रवासी,
● रिक्षा : 1+2 प्रवासी,
● चारचाकी : 1+3 प्रवासी,
● दुचाकी : 1+1 हेल्मेट व मास्क परवानगी

दरम्यान, मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती देण्यात आल्या असल्या तरी सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.