सोलापूर, दि. 23 :
शहरात लसीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. उद्या (दि.24) 38 लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. यातील एका लसीकरण केंद्रावर गर्भवती महिलांसाठी तर 37 लसीकरण केंद्रावर दुसरा डोस देण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रत्येक लसीकरण केंद्रावर 94 डोस देण्यात येणार आहेत. यात 50 डोस ऑनलाईन करिता तर 44 डोस ऑन स्पॉट देण्यात येणार आहेत.
यातील माहिती खालील प्रमाणे..
मदर तेरेसा पॉलिक्लिनीक, डफरिन हॉस्पिटल कॅम्पस येथे गर्भवती महिलासाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यासाठी गर्भवती महिलांनी आपल्याकडील ANC कार्ड, आधारकार्ड व मोबाईल फोन घेवून सकाळी 10.00 सायं 5.00 या वेळेत उपस्थित रहावे. सहव्याधी असणाऱ्या गर्भवती महिलांनी आपल्या डॉक्टरांचा वैद्यकिय सल्ला घेवून लसीकरणासाठी यावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. नियोजित वेळेत लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे. कोव्हिड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये व तात्काळ कोव्हिड चाचणी करुन घ्यावी कोव्हिड चाचणीचा अहवाल येईपर्यत लस घेण्याचे टाळावे. असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.