Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

उदगीर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बीएस. सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांमार्फत मौजे डिगोळ येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाच्या (केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना) यामध्ये गाय, म्हैस, शेळी गटातील पशुंना लाळ व खुरकत रोगाचे लसीकरण,कृत्रिम रेतन, गर्भतपासणी आणि जनावरांच्या वजनानुसार योग्य आहार किती असावा असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

याप्रसंगी पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एम.केंद्रे यांनी उपस्थित सर्व पशुपालक, शेतकरी मंडळींना मार्गदर्शन केले. यासोबतच सहाय्यक तैमुर पठाण, इंद्रजीत सोमवंशी, अजीम बेग यांनी पशूंचे लसीकरण करण्यासाठी सहाय्य केले. या उपक्रमा अंतर्गत गावातील पशुपालक रामदास गायकवाड,गंगाधर वाघमारे, शंकर मुळे, संभाजी काळे, शेषराव कांबळे आणि इतर पशुपालकांनी पशुंना लसीकरण करून घेतले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.

उपक्रमाचे नियोजन व आयोजन कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी ओम हनमे, अक्षय डोके, समर्थ जगताप, शुभम जगताप, सुरज जाधव, प्रसाद कांबळे व प्रदीप कनडुकरी यांनी केले. या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. ए.एम. पाटील, कार्यक्रम समन्वय डॉ. एस.एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.आर. खंडागळे तसेच विषयतज्ञ डॉ. एस.एल. खटके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *