- मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल
- निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांचे दातृत्व
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सोलापूर : वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांच्या दातृत्वातून माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी या विद्यार्थिनीस मोबाईल देण्यात आला.
महाविद्यालय ऑफलाईन सुरू झाले असले तरी काही अभ्यासक्रम, प्रकल्प आणि नोट्स मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यात येत आहेत. त्यामुळे आतादेखील मोबाईलची गरज आहे. अक्षता स्वामी या विद्यार्थिनीकडे मोबाईल नसल्यामुळे तिच्या शिक्षणात अडचणी येत होत्या.
काही दिवसांपूर्वी वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि श्रुती मरगुर हिच्या पहिल्या पगारातून श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, द्वितीय वर्ष) व अंकिता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, प्रथम वर्ष) या दोन विद्यार्थिनींना 11 हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती. त्याची दैनिकातील बातमी पाहून महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी वीरशैव व्हिजनकडे संपर्क साधून त्या विद्यार्थिनींना आणखी कशाची गरज आहे का? याची विचारणा केली. तेव्हा मोबाईलची अडचण त्यांच्यासमोर मांडली असता त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीस 10 हजार रुपयांचा एक नवा मोबाईल घेऊन दिला.
याप्रसंगी निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, अक्षय नवले उपस्थित होते.
या विद्यार्थिनीसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे.
याप्रसंगी विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.
माता-पित्याचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिल्याची बातमी दैनिकातून वाचली. तेंव्हा आपणही काहीतरी दिले पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांची गरज पूर्ण करता आली याचे मला समाधान वाटले. यापुढील काळातही अशा विद्यार्थ्यांना मदत करणार आहे.
वैजनाथ स्वामी
निवृत्त महापालिका अधिकारी