शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर त्यांच्या गाडीला अपघात झाला. विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पहाटे पाचच्या दरम्यान गाडीला अपघात झाला होता. अपघात स्थळीस त्यांचे निधन झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे.आज रविवारी दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
सकाळी साधारण साडेसहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती दिली आहे.
पनवेल येथील रुग्णालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मराठा संघटनेची बोलवली बैठक रद्द केलेली आहे. याच बैठकीसाठी विनायक मेटे जात होते. शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे समाजकार्य मराठा बांधवांसाठी केले होते.
मोठा सामाजिक नेता हरपल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे सामाजिक प्रश्नांसाठी मेटे कायम लढले. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.