Big9 News
सोलापूरात जागतिक जल दिनानिमित्त ड्रीम फाउंडेशन, चाणक्य गुरुकुल व संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीने रविवार दि. १९ मार्च रोजी जलसाक्षरता संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी दिली. जलजागृतीसाठी १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे. शनिवार दि. १८ मार्च रोजी वालचंद महाविद्यालयात भूगर्भ शास्त्र विभागात जल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी १० वाजता जलसाक्षरता संमेलनाचे उद्घाटन खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी सीईओ संदीप कोहीनकर, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित राहणार आहेत. कमी पाण्यातील शेती व जलनियोजन, जलप्रदूषण व उपाय यावर परिसंवादात श्रीनिवास वडगबाळकर, विजयकुमार बरबडे, शैलेंद्र पटेल, धनंजय शहा, विक्रमसिंह मगर यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता धर्मवीर संभाजी तलाव येथे जल व वन दिंडी काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महापालिका आयुक्त शीतल उगले, संदीप कारंजे, बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी आदी उपस्थित रहाणार आहेत. ही दिंडी पत्रकार भवन, सात रस्ता, रंगभवन मार्गे सिद्धेश्वर मंदिर येथे समारोप होणार आहे. दक सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचा जलनायक ले. पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नॅचरल पत्र शुगरचे बी.बी. ठोंबरे, पत्रकार रजनीश जोशी व नांनी अभियंता संजय धनशेट्टी यांचा गौरव करण्यात येणार ने. असल्याची माहिती संगप्पा केरके यांनी दिली.