मुंबई,दि.4 : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेतली. अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. त्याऐवजी कडक निबंध लावण्यात यावेत अशी मागणी अनेकांनी केली.
महाराष्ट्रात संपूर्णपणे नसला तरी अंशतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
काय सुरू? काय बंद
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
लोकल ट्रेन सुरू राहणार
जिम बंद होणार
अत्यावश्यक सेवांना परवनगी
रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत ः बंद
गार्डन, मैदाने बंद
.जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक
प्रशासनाला
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
टॅक्सीत मास्क घालावा
अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत.