Big9 News
मोहोळ मधे होणाऱ्या लोकसभेचा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी परंतु पक्षाच्या आदेशाचे ही पालन करा, असे प्रतिपादन मोहोळ येथे जिल्हा बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांनी केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले हे होते. यावेळी महा. संघटक सुनिल सर्वगोड, महा.उपध्यक्ष बापूसाहेब जगताप, प.महा.सरचिटणीस जितेद्र बनसोडे, प.महा.उपध्यक्ष एन.के साळवे, प.महा.संघटक नागनाथ ओहोळ, प.महा.सचिव चंद्रकांत वाघमारे, प.महा.सचिव दयानंद धाईजे, प.महा.संघटक विरेद्र कांबळे, हणमंत कसबे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर गायकवाड, जिल्हा कार्यध्यक्ष विक्रम शेळके, धिरज मोरे जिल्हा कोषाध्यक्ष विठ्ठल क्षिरसागर, अंकूश शेंडगे शिरीष ढवळे आदी उपस्थित होते. . या बैठकीचे आयोजन हणमंत कसबे यांनी केले होते.
यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष नानासाहेब सोनवणे पोपट कापूरे रजनिश कसबे युवक तालुका अध्यक्ष मार्तड काळे सुनिल जवंजाळ आबासाहेब कुचेकर अमोल जगताप केदार कोबळे आनंद सरवदे शिवाजी चंदनशिवे राजाराम जगताप आदी सह पदाधीकारी उपस्थित होते.